पक्षी गेला मोक्षी
बसला नाही रडत, ओक्साबोक्शी
सहजच सुचलं हे हायकू (Haiku), ह्या blogpost च्या शेवटी टाकलेला तो WhatsApp वर आलेला Forward वाचता क्षणी!
मग Google वर थोडा search केला तेव्हां यावर काही research वजा माहिती मिळाली.
आणि तो WhatsApp वर आलेला Forward as follows:
एक रहस्य
पक्षी मरताना कुठे जातात?
आजपर्यंत कधी एका पक्ष्याला पण झाडाखाली मरुन पडलाय किंवा अजुन कुठे आमच्या Colonyच्या परिसरात मृतावस्थेत पडलाय असे बघीतले नाही . किंबहुना जगात कुठेही असा मृत पक्षी मिळालाय असे आढळत नाही.
हां.. एखाद्या मांजरीने मारुन निष्काळजी पणे सोडुन दिलेले अवशेष किंवा एखाद्या अपघातात चिरडलेले पक्षी बर्याच वेळा दिसले असतिल पण नैसर्गीक मेलेला पक्षी आजपर्यत तरी कुठेच आढळत नाही.
मग पक्षी काय अमर असतात का ? की त्यांना नैसर्गिक मरण यैतच नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे गुगल वर पण शोधायचा प्रयत्न केला. पण गुगलने पण काही तर्कशुध्द उत्तर दिले नाही.
अनेक पक्षी निरीक्षणांच्या साईट्स, पक्षीतज्ञांचे लेख सर्व काही शोधुन झाले पण कुठेही काही ठोस उत्तर मिळाले नाही.
आणि मग ह्या प्रयत्नातच एक रंजक लेख वाचायला मिळाला “Dying pattern of Birds”
ह्या लेखात *काॅर्क बिशप ल्युसी* यांनी एक थोडी वादग्रस्त ठरु शकणारी थेअरी मांडलीय, लेखाची सुरवातच पक्षी मरण्यासाठी कुठे जातात अशी करुन बिशप ल्युसि ने सर्वांनाच असे आव्हान दिलेय की कुणीही जगात नैसर्गिक मृत झालेल्या पक्षी पुरावा म्हणुन दाखवावा. आजपर्यंत तरी त्याचे हे आव्हान कुणीही स्वीकारलेले नाही.
लेखकाने मरण्याच्या कारणांची स्पष्ट वर्गवारी दिलीय, एकीकडे नैसर्गीक कारण दूसरीकडे शिकार, अपघात, मूद्दाम पक्षीहत्या अशी वेगळी कारणे. परंतु मजेची गोष्ट अशी की आजपर्यत तरी नैसर्गिक कारणाने मृत असा एकही पक्षी कुणी पुरावा म्हणून सादर करु शकले नाहीय,पक्षी शास्त्रज्ञसुध्दा ह्या बाबतीत ठोस सांगु शकत नाही. दरवर्षी पक्ष्यांची गणना करुन ते सरासरी पक्ष्यांचा मृत्युदर ठरवतात.
ह्या बिशप ल्युसींचा मधमाश्यांच्या जीवनक्रमावरचे संशोधन जगमान्य आहे, ते सांगतात मधमाशा मृत्यु समीप आला की खूप उंच वरच्या उच्च दबावाच्या हवेत स्वतःला घेउन जातात आणि तिथे दबावामुळे त्यांचे अक्षरशः नैसर्गिक विघटन होते आणि त्या नष्ट होउन जातात. यावरुन बिशप म्हणतात की पक्ष्यांना सुध्दा मधमाशाप्रमाणे अंतःप्रेरणेच एक इंद्रिय असावे जे त्यांना जाणीव करुन देते की आता शेवटचा क्षण आला आहे किंवा जीवनकाल संपत आलाय. आणि ही जाणीव होताच पक्षी आकाशात स्वःतला उंच उंच घेउन जातात जो पर्यत त्यांचे विघटन होत नाही तो पर्यत ते वरती वरतीच चढत जातात. बिशप ची ही थेअरी मला तरी स्वीकारार्ह वाटते कारण दुसरे कुठलेच लाॅजिकल स्पष्टीकरण सध्या तरी नाही.
अजूनपर्यंत तरी ह्या थेअरीला शास्त्रज्ञांकडून कुठलेही खंडन झालेले नाही. ह्या एका गोष्टीवरुन आपण एक गोष्ट निश्चितच म्हणू शकतो की पक्षी मानवापेक्षा उत्कांतीच्या पुढच्या पायरीवर आहेत की त्यांना ही जाणीव होउ शकते की आपला अंत्यसमय आलाय जे माणसालाअजुनही अज्ञात आहे. पक्षी निश्चीत ठरवू शकतो की त्याने खूप जगुन झालेय,बघून झालेय आणि तो आनंदाने कसलीही खंत चिंता न बाळगता उंच उडून शरीराचे विघटन करुन टाकतो.न वयानुसार येणार्या व्याधी, न सोसायचे दुःख. आपल्या पेक्षा ते पुढेच आहेत कुठेही जाण्याचे, विहाराचे स्वातंत्र्य, कुठलीही सीमा नाही , पासपोर्ट नाही, पिल्ले मोठी झाली की त्यांच्यापासुन सहजगत्या स्वतःला सोडवुन परत कधीही न भेटणे सहज स्विकरणारी. स्वतःचा मृत्यू निश्चित करणारी…
मोक्ष !!!
अजुन काय वेगळा असतो !!!!!!
Isn't this the Nature's own arrangement to become-One (Yog) with the almighty God: The LEAN Management in so-called professional lingo!